जयसिंगपूर येथे सामूहिक आरती, बालसंस्कार वर्ग आणि आध्यात्मिक ग्रंथालयास प्रारंभ

 


जयसिंगपूर (जिल्हा कोल्हापूर) येथे सामूहिक आरती, बालसंस्कार वर्ग आणि आध्यात्मिक ग्रंथालयास प्रारंभ 



जयसिंगपूर (जिल्हा कोल्हापूर) - ३१ प्रमोद पाटील 

 शिर्डी येथे पार पडलेल्या तृतीय महाराष्ट्र मंदिर - न्यास परिषदेत ठरल्यानुसार जयसिंगपूर येथे 11 वी गल्ली येथे असणारे मंदिर विश्‍वस्त आणि  महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कोल्हापूर जिल्हा उपाध्यक्ष श्री. भगवंतराव जांभळे यांच्या खासगी मालकीच्या श्री दत्त मंदिरात सामूहिक आरती, बालसंस्कार वर्ग आणि आध्यात्मिक ग्रंथांचे ग्रंथालय चालू करण्यात आले.


प्रारंभी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे श्री. महेंद्रसिंग रजपूत यांचे हस्ते श्रीकृष्ण प्रतिमा पूजन करण्यात आले, तर जेष्ठ नागरिक श्री. विष्णु हात्तळगे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून अध्यात्मिक ग्रंथालयाचे उद्घाटन करणेत आले. या प्रसंगी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे श्री. भगवंतराव जांभळे, श्री. प्रकाश फडतारे, श्री. सुमंत रत्नपारखे, श्री स्वामी समर्थ दरबारचे विश्‍वस्त श्री. विनय कदम, ग्रामदैवत श्री सिद्धेश्‍वर मंदीराचे विश्‍वस्त श्री. राजेंद्र दाईंगडे, कापड व्यापारी श्री. निर्मल पोरवाल, सौ. भक्ती जांभळे, तसेच हिंदु जनजागृती समितीचे श्री. संजय घाटगे उपस्थित होते.




Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.