निष्णात अर्थतज्ञ आणि शांत- संयमी नेतृत्व हरपले, भारतीय राजकारणाची मोठी हानी, खासदार धनंजय महाडिक

 निष्णात अर्थतज्ञ आणि शांत- संयमी नेतृत्व हरपले, भारतीय राजकारणाची मोठी हानी, खासदार धनंजय महाडिक


कोल्हापूर २७ प्रमोद पाटील 


माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचे निधन देशाची हानी करणारे आहे. एकनिष्णात अर्थतज्ञ म्हणून त्यांनी दिलेले योगदान कधीच विसरता येणार नाही. तर एक शांत, संयमी आणि निष्कलंक नेतृत्व म्हणूनही मनमोहन सिंग यांची राजकीय कारकीर्द कायम स्मरणात राहील. पक्षनिष्ठा आणि मिळालेल्या पदाला पूर्ण न्याय देण्याचा त्यांचा हातखंडा राजकारणातील प्रत्येक कार्यकर्त्यासाठी आदर्शवत आहे. काँग्रेस पक्षाच्या जडणघडणीत आणि देशाच्या प्रगतशील वाटचालीमध्ये मनमोहन सिंग यांचे योगदान मोठे आहे. अशा या ज्येष्ठ नेत्याला आदरांजली..

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.