स्थलांतरित बालकाच्या शिक्षण हक्क विषयी कोल्हापुरात परिषदेचे आयोजन : "अवनी" च्या अनुराधा भोसले ची माहिती
कोल्हापूर २५ प्रमोद पाटील
ऊस गळीत हंगामासाठी बीड - मराठवाडा मधून येणारे ऊस तोडणी कामगार कामगारांची मुले आणि वीट भट्टीवर असणाऱ्या कामगारांची मुले स्थलांतरित बालकांच्या मूलभूत शिक्षण हक्कासाठी शासनाने ठोस पावले उचलावीत यासाठी येत्या 27 आणि 28 डिसेंबर रोजी व्यापक परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे .
हॉटेल वूड लॅण्ड येथे होणाऱ्या या परिषदेमध्ये कोल्हापूर सांगली जिल्ह्यातील विविध सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन - पदाधिकारी , जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी , जिल्हाधिकारी , साखर संचालक तसेच सहकार - साखर क्षेत्रात कार्यरत विविध एनजीओ - संस्था चे मान्यवर यांचा सहभाग असणार आहे या परिषदेमधून होणारे विचार मंथन आणि केल्याने ठराव याचा पाठपुरावा करून स्थलांतरित बालकांसाठी कायमस्वरूपी शिक्षकांची शिक्षणाची सोय व्हावी तसेच ते मूळ गावी गेल्यानंतर पुढील शिक्षण त्या ठिकाणी मिळावे आणि कोणत्याही प्रकारे त्यांच्या शिक्षणात खंड पडू नये यासाठी आग्रही राहणार असल्याची माहिती "अवनी" च्या अनुराधा भोसले यांनी सांगितले .



