विरोधी पक्षनेते राहुल गांधी कोल्हापूर दौऱ्यावर : विविध कार्यक्रमाचे आयोजन
कोल्हापूर २ अविनाश काटे
लोकसभा निवडणुकीत काँगेस पक्षाला मिळाल्याला यशानंतर प्रथमच लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी कोल्हापूर जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यानिमित्त भरगच्च कार्यक्रमांचे नियोजन करण्यात आले असल्याची माहिती आमदार सतेज पाटील यांनी दिली.
काँग्रेसतर्फे मा.राहुल गांधी यांचा दौरा यशस्वी होण्यासाठी जय्यत तयारी करण्यात येत आहे. मा.राहुल गांधी यांच्या हस्ते ४ ऑक्टोबर रोजी कसबा बावडा येथील भगवा चौकात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावर होणार आहे .५ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या संविधान सन्मान संमेलनाला ते उपस्थित राहणार असल्याची माहिती आमदार सतेज पाटील यांनी दिली.

.jpeg)

