तेरा वर्षाखालील मुलांची कोल्हापूर जिल्हा निवड बुद्धिबळ स्पर्धा

 साई सर्व्हिसेस पुरस्कृत तेरा वर्षाखालील मुलांची कोल्हापूर जिल्हा निवड बुद्धिबळ स्पर्धा

 विवान, शौर्य, संस्कृती व सिद्धीची राज्य स्पर्धेसाठी साठी निवड



 कोल्हापूर २० प्रमोद पाटील 


  सेंट झेवियर्स हायस्कूल येथे चेस असोसिएशन कोल्हापूरने आयोजित केलेल्या तेरा वर्षाखालील मुला मुलींच्या कोल्हापूर जिल्हा निवड बुद्धिबळ स्पर्धा आज संपन्न झाल्या.

 मुलांच्या गटात अग्रमानांकित इचलकरंजीचा विवान सोनी व तृतीय मानांकित इचलकरंजीचा शौर्य बांगडीया तर मुलींच्या गटात द्वितीय मानांकित नांदणीची संस्कृती सुतार व अग्रमानांकित जयसिंगपूरची सिद्धी कर्वे यांची निवड तेरा वर्षाखालील महाराष्ट्र राज्य निवड व गुणांकन बुद्धिबळ स्पर्धेसाठी झाली आहे. निवड झालेल्या बुद्धिबळपटूना रोख बक्षीसे व चषक देऊन गौरवण्यात आले.

 स्पर्धेचा बक्षीस समारंभ साई सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड सेल्स एक्झिक्युटिव्ह शिवम पवार व सेल्स मॅनेजर सागर पाटील, इंद्रजीत कर्वे,राजू पोर्लेकर व सुधीर देसाई यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी व्यासपीठावर आंतरराष्ट्रीय पंच भरत चौगुले, मुख्य पंच मनिष मारुलकर व अनिश गांधी होते. 

 *उत्तेजनार्थ बक्षीस हे पुढील प्रमाणे*

 मुले -

 तृतीय क्रमांक - अर्णव पोर्लेकर कोल्हापूर 

 चौथा क्रमांक - आदित्य ठाकूर अतिग्रे पाचवा क्रमांक - सर्वेश पोतदार कोल्हापूर

 अकरा वर्षाखालील बुद्धिबळपटू

1) वेदांत बांगड इचलकरंजी  2) आराध्य ठाकूर देसाई इचलकरंजी 

नऊ वर्षाखालील बुद्धिबळपटू

1) अर्णव जोशी कोल्हापूर 

 मुली 

 तृतीय क्रमांक - सिद्धी बुबणे नांदणी, चौथा क्रमांक - सृष्टी जोशीराव कोल्हापूर, पाचवा क्रमांक - नंदिनी सारडा इचलकरंजी.

 अकरा वर्षाखालील बुद्धिबळपटू 

1) निधी पोटे चंदगड 2) आरोही बनसोड कोल्हापूर

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.