जिओला 8 वर्ष पूर्ण : वर्धापनदिनानिमित्त विविध ऑफर्स

 जिओला  8 वर्ष पूर्ण : वर्धापनदिनानिमित्त विविध ऑफर्स 


कोल्हापूर ५ प्रमोद पाटील 

टेलिकॉम क्षेत्रातील दिग्गज कंपनी रिलायन्स जिओ 5 सप्टेंबर 2024 रोजी आपल्या लाँचची 8 वा वर्धापनदिन साजरा  करत आहे. ट्राय  च्या मते, जिओच्या लाँचपूर्वी प्रत्येक भारतीय ग्राहक दर महिन्याला फक्त 410 एमबी डेटा वापरत असे पण आता फक्त जिओच्या नेटवर्कवर डेटा वापर 73 पट अधिक वाढून दरमहा प्रति ग्राहक 30.3 जीबीच्या आश्चर्यकारक पातळीवर पोहोचला आहे, म्हणजेच दररोज प्रति ग्राहक 1 जीबीपेक्षा जास्त. जिओ वापरकर्त्यांच्या जास्त वापरामुळे टेलिकॉम उद्योगातील डेटा वापर देखील वाढला असून, आता टेलिकॉम क्षेत्रातील वापरकर्ते दर महिन्याला सुमारे 25 जीबी डेटा वापरत आहेत.


रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी यांनी 8 वर्षांपूर्वी जेव्हा जिओ लाँच केले होते, तेव्हा कुणालाही वाटले नव्हते की काहीच वर्षांमध्ये जिओ केवळ देशातील नव्हे तर जगातील सर्वात मोठ्या टेलिकॉम कंपन्यांमध्ये समाविष्ट होईल. 13 कोटी 5जी ग्राहकांसह जिओचा ग्राहक बेस 49 कोटी झाला आहे. आज जिओ नेटवर्क जगातील सर्वात मोठे मोबाइल ट्रॅफिक डेटा नेटवर्क आहे. जगातील 8 टक्के मोबाइल डेटा ट्रॅफिक जिओ नेटवर्कवर चालतो. जिओ वापरकर्ते 148.5 अब्ज जीबी डेटा वापरतात, जो देशातील एकूण डेटा वापराचा 60% आहे. जिओमुळे भारत डेटा वापराच्या बाबतीत 155 व्या स्थानावरून पहिल्या स्थानावर पोहोचला आहे.


4जी तंत्रज्ञान आणि वेगाच्या बाबतीत रिलायन्स जिओचा विक्रम उत्कृष्ट राहिला आहे. आता 5जीसाठीही कंपनीच्या मोठ्या योजना समोर येत आहेत. सर्वांसाठी एआय , कनेक्टेड ड्रोन, कनेक्टेड ॲम्ब्युलन्स-रुग्णालय, कनेक्टेड शेती ,कनेक्टेड शाळा-कॉलेज, ई-कॉमर्स इझ, अविश्वसनीय वेगाने-एंटरटेनमेंट, रोबोटिक्स, क्लाउड पीसी, इमर्सिव तंत्रज्ञानासह वर्च्युअल थिंग्स सारख्या तंत्रज्ञानात कंपनीने निपुणता मिळवली आहे.


जिओच्या येण्याने देशाला अनेक क्षेत्रात फायदा झाला आहे. फ्री कॉलिंगमुळे मोबाइल ठेवण्याचा खर्च कमी झाला आहे. जगातील सर्वात स्वस्त डेटा बाजारांपैकी एक भारत आहे. डेटा स्वस्त झाल्याने डिजिटल अर्थव्यवस्था मजबूत झाली आहे. ऑनलाइन व्यवहारांमध्ये आपण विकसित आणि महासत्ता देशांना मागे टाकले आहे. ई-कॉमर्सला नवीन जीवन मिळाले आहे. घरबसल्या खरेदी, तिकीट खरेदी, मनोरंजन आणि बँकिंग सोपे झाले आहे. नवीन व्यवसाय पुढे आले आहेत आणि युनिकॉर्न कंपन्यांची लाट आली आहे आणि यामुळेच रोजगारही लक्षणीय प्रमाणात वाढला आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.