महाराष्ट्र राज्य निवड बुद्धिबळ स्पर्धेचे ३० ऑगस्ट रोजी आयोजन

 


चेस असोसिएशन कोल्हापूरच्या वतीने कोल्हापुरात सलग दोन (अकरा वर्षाखालील व एकोणवीस वर्षाखालील मुला-मुलींची)महाराष्ट्र राज्य निवड बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन



ब्राह्मण सभा करवीर मंगलधाम व शिरगावकर ग्रुप ऑफ कंपनीचे मोठे सहकार्य

कुमार व किशोर बुद्धिबळपटूंना क्लासिकल आंतरराष्ट्रीय गुणांकन मिळवण्याची व वाढविण्याची सुवर्णसंधी

पहिल्यांदाच कोल्हापुरात सलग दोन राज्य निवड व आंतरराष्ट्रीय गुणांकन स्पर्धेचे आयोजन

कोल्हापूर २७ प्रमोद पाटील 

जागतिक बुद्धिबळ संघटना,अखिल भारतीय बुद्धिबळ संघटना व महाराष्ट्र बुद्धिबळ संघटनेच्या मान्यतेने चेस असोसिएशन कोल्हापूर ने कोल्हापुरात महाराष्ट्र राज्य अकरा वर्षाखालील मुला मुलींच्या व महाराष्ट्र राज्य ज्युनिअर (एकोणवीस वर्षाखालील) मुला मुलींच्या निवड व आंतरराष्ट्रीय गुणांकन बुद्धिबळ स्पर्धा अशा साधारण सलग दोन राज्य निवड व आंतरराष्ट्रीय गुणांकन बुद्धिबळ स्पर्धांचे आयोजन करण्याचे धाडस दाखवले आहे.

या दोन निवड स्पर्धा पैकी प्रथम  एच् टू ई महाराष्ट्र राज्य अकरा वर्षाखालील मुला मुलींची निवड व आंतरराष्ट्रीय गुणांकन बुद्धिबळ स्पर्धा दिनांक 30 ऑगस्ट ते 1 सप्टेंबर दरम्यान ब्राह्मण सभा करवीर मंगलधाम येथे होणार आहे.त्यानंतर एच् टू ई महाराष्ट्र राज्य ज्युनियर (19 वर्षाखालील) मुला-मुलींची निवड व आंतरराष्ट्रीय गुणांकन बुद्धिबळ स्पर्धा दिनांक पाच सप्टेंबर ते सात सप्टेंबर दरम्यान , मांगल्य मल्टीपर्पज हॉल, ताराबाई पार्क येथे होणार आहे.एच् टू ई पॉवर सिस्टिमस् ही कंपनी प्रत्येक महाराष्ट्र निवड बुद्धिबळ स्पर्धेसाठी टायटल स्पॉन्सर म्हणून आहे.दोन्ही स्पर्धेसाठी प्रत्येक जिल्ह्यातील फक्त निवड झालेल्या खेळाडूंची रहाण्याची व्यवस्था मोफत केली आहे.

  •  दोन्ही स्पर्धेची सविस्तर माहिती पुढील प्रमाणे आहे.


1) ॲडव्होकेट पी.आर. मुंडरगी स्मृती ब्राह्मण सभा करवीर मंगलधाम पुरस्कृत - एच् टू ई महाराष्ट्र राज्य अकरा वर्षाखालील मुलामुलींच्या निवड व आंतरराष्ट्रीय गुणांकन बुद्धिबळ स्पर्धा*

या स्पर्धा शुक्रवार दिनांक 30 ऑगस्ट पासून रविवार दिनांक एक सप्टेंबर पर्यंत *ब्राह्मण सभा करवीर मंगल धाम, बिनखांबी गणेश मंदिर जवळ, कोल्हापूर* येथे होणार आहेत.तीन दिवस चालणाऱ्या या स्पर्धा स्विस् लिग पद्धतीने क्लासिकल आंतरराष्ट्रीय बुद्धिबळाच्या नियमानुसार एकूण आठ फेऱ्यात होणार आहेत. अकरा वर्षाखालील खुल्या व मुलींच्या स्वतंत्र गटात या स्पर्धा होणार आहेत.या स्पर्धेतून दोन मुलांची व दोन मुलींची निवड हैदराबाद येथे दिनांक 04 ते 10  आक्टोंबर दरम्यान होणाऱ्या अखिल भारतीय अकरा वर्षाखालील राष्ट्रीय निवड व आंतरराष्ट्रीय गुणांकन बुद्धिबळ स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघात केली जाणार आहे.या स्पर्धेमध्ये मुले आणि मुलींच्या प्रत्येक गटात पहिल्या दहा क्रमांक विजेत्यांना एकूण पंधरा हजार प्रमाणे दोन्ही गटात मिळून एकूण तीस हजार रूपयांची रोख बक्षीस आणी चषक व मेडल्स बक्षीसे म्हणून दिले जाणार आहेत.दोन्ही गटातील विजेत्याला रोख साडेतीन हजार व चषक उपविजेत्याला रोख दोन हजार रुपये व चषक तर तृतीय क्रमांकास रोख अठराशे रुपये व चषक देऊन गौरविण्यात येणार आहे. चौथ्या क्रमांकास पंधराशे रुपये,पाचव्या क्रमांकास बाराशे रुपये व क्रमांक सहा ते दहा प्रत्येकी एक हजार रुपयांचे बक्षीस ठेवले आहे.आहे.याव्यतिरिक्त 7 व 9 वर्षाखालील मुलांना उत्तेजनार्थ बक्षीस म्हणून प्रत्येक गटात तीन चषक देण्यात येणार आहे.

01/01/2013 ला किंवा त्यानंतर जन्मलेले फक्त महाराष्ट्रातील मुले मुली या स्पर्धेत भाग घेऊ शकतात.स्पर्धेत भाग घेण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यातून निवड झालेल्या बुद्धिबळपटूस एक हजार रुपये व निवड न झालेल्या बुद्धिबळपटूस दोन हजार रुपये प्रवेश शुल्क ठेवण्यात आले आहे.या प्रमाणे प्रत्येकाने महाराष्ट्र बुद्धिबळ संघटनेच्या अधिकृत  संकेतस्थळावर प्रवेश फीसह नावनोंदणी करावयाची आहे‌.

या स्पर्धा ब्राह्मण सभा करवीर मंगलधाम ने ॲडव्होकेट पी.आर्.मुंडरगी यांच्या स्मृती प्रित्यर्थ ॲडव्होकेट अशोक मुंडरगी यांच्या सहकार्याने प्रायोजित केल्या आहेत.


2) एस बी रिशेलर्स व सीएनर्जी ग्रीन(शिरगावकर ग्रुप ऑफ कंपनीज् ) पुरस्कृत - एच् टू ई महाराष्ट्र राज्य ज्युनिअर (एकोणवीस वर्षाखालील) मुलामुलींच्या निवड व आंतरराष्ट्रीय गुणांकन बुद्धिबळ स्पर्धा

या स्पर्धा गुरुवार दिनांक पाच सप्टेंबर पासून शनिवार दिनांक सात सप्टेंबर पर्यंत मांगल्य मल्टिपर्पज सभागृह, ब्लूमिंग बड्स स्कूल जवळ, मेनन बंगल्या समोर, ताराबाई पार्क, कोल्हापूर मध्ये होणार आहेत.तीन दिवस चालणाऱ्या या स्पर्धा स्विस् लिग पद्धतीने क्लासिकल आंतरराष्ट्रीय बुद्धिबळाच्या नियमानुसार एकूण आठ फेऱ्यात होणार आहेत.एकोणवीस वर्षाखालील खुल्या व मुलींच्या स्वतंत्र गटात या स्पर्धा होणार आहेत.या स्पर्धेतून चार मुलांची व सहा मुलींची निवड हरियाणा येथे दिनांक 16 सप्टेंबर ते 24 सप्टेंबर दरम्यान होणाऱ्या अखिल भारतीय राष्ट्रीय ज्युनिअर (एकोणवीस वर्षाखालील) निवड व आंतरराष्ट्रीय गुणांकन बुद्धिबळ स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघात केली जाणार आहे.या स्पर्धेमध्ये मुले आणि मुलींच्या प्रत्येक गटात पहिल्या दहा क्रमांक विजेत्यांना एकूण तीस हजार प्रमाणे दोन्ही गटात मिळून एकूण साठ हजार रूपयांची रोख बक्षीस आणी चषक व मेडल्स बक्षीसे म्हणून दिले जाणार आहेत.दोन्ही गटातील विजेत्याला रोख सात हजार व चषक उपविजेत्याला रोख चार हजार रुपये व चषक तर तृतीय क्रमांकास रोख छत्तीसशे रुपये व चषक देऊन गौरविण्यात येणार आहे. चौथ्या क्रमांकास तीन हजार रुपये,पाचव्या क्रमांकास चोवीसशे रुपये व क्रमांक सहा ते दहा प्रत्येकी दोन हजार रुपयांचे बक्षीस ठेवले आहे.याव्यतिरिक्त 7, 9, 11, 13 व 15 वर्षाखालील मुलांना उत्तेजनार्थ बक्षीस म्हणून प्रत्येक गटात तीन चषक देण्यात येणार आहे.

01/01/2005 ला किंवा त्यानंतर जन्मलेले फक्त महाराष्ट्रातील मुले मुली या स्पर्धेत भाग घेऊ शकतात.स्पर्धेत भाग घेण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यातून निवड झालेल्या बुद्धिबळपटूस एक हजार रुपये व निवड न झालेल्या बुद्धिबळपटूस दोन हजार रुपये प्रवेश शुल्क ठेवण्यात आले आहे.या प्रमाणे प्रत्येकाने महाराष्ट्र बुद्धिबळ संघटनेच्या अधिकृत  संकेतस्थळावर प्रवेश फीसह नावनोंदणी करावयाची आहे‌.

या स्पर्धा एस्.बी.रिशेलर्स व सीएनर्जी ग्रीन ( शिरगावकर ग्रुप ऑफ कंपनीज् ) ने प्रायोजित केल्या आहेत.

या दोन्ही स्पर्धा आंतरराष्ट्रीय गुणांकनाच्या होणार असल्याने  महाराष्ट्रातील कुमार व किशोर गटातील बुद्धिबळपटूना क्लासिकल आंतरराष्ट्रीय गुणांकन मिळण्यासाठी व वाढवण्यासाठी अतिशय उपयुक्त आहेत.विशेषकरून स्थानिक कोल्हापूर जिल्हातील व शेजारील सांगली, सातारा, सोलापूर, रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बुद्धिबळपटू ना सुवर्णसंधीच आहे.


वरील माहिती चेस असोसिएशन कोल्हापूरचे अध्यक्ष भरत चौगुले, सचिव मनीष मारुलकर, स्पर्धा संचालक धीरज वैद्य, ब्राह्मण सभा करवीर चे अध्यक्ष संतोष कोडोलीकर, कार्यवाह श्रीकांत लिमये यांनी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत वरील माहिती दिली. यावेळी   खजिनदार रामचंद्र टोपकर, सहयोगी सदस्य एन. ए. कुलकर्णी, अनिश गांधी व प्रशांत पिसे उपस्थित होते..

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.