कोरिया येथील दोन चॅम्पियनशिप च्या स्पर्धेसाठी जेएसटीएआरसी कोल्हापूरचा संघ रवाना

कोरिया येथील दोन चॅम्पियनशिप च्या स्पर्धेसाठी जेएसटीएआरसी कोल्हापूरचा संघ रवाना


कोल्हापूर ६ प्रमोद पाटील,

कोरिया येथील २०२४ चुनचेऑन कोरिया ओपन आंतरराष्ट्रीय तायक्वॅान्डो चॅम्पियनशिप आणि जागतिक तायक्वॅान्डो कल्चरल एक्सपो' २०२४ अशा दोन चॅम्पियनशिप च्या स्पर्धेसाठी जेएसटीएआरसी कोल्हापूरचा संघ रवाना


कोल्हापूर : जेएसटीएआरसी ही कोल्हापुरातील स्वसंरक्षणासाठी तायक्वॅान्डोचे प्रशिक्षण देणाऱ्या या नामांकित संस्थेच्या वार्षिक कार्यक्रमाचा भाग म्हणून  जेएसटीएआरसी “कोरियाफेस्ट” अंतर्गत दक्षिण कोरीया येथील आंतरराष्ट्रीय तायक्वॅान्डो कार्यक्रमात दरवर्षी सहभागी होते व विद्यार्थ्यांना तायक्वॅान्डो मधील विविध स्पर्धांचे प्रशिक्षण व सहभागी होण्याची संधी देते. 


यावर्षी या संस्थेच्या कोल्हापूर शाखेतील दोन विद्यार्थी कु. नील भोसले( वि. स.खांडेकर कोल्हापूर.) व कु.राणोजी माने( संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूल)आणि त्यांचे मार्गदर्शक व कोल्हापूर संस्थेचे प्रमुख प्रशिक्षक अमोल भोसले यांच्याबरोबर या स्पर्धेत सहभागी होत आहेत. कोल्हापूरचा संघ हा या मुख्य संघाच्या इतर सदस्यांच्या बरोबरीने दक्षिण कोरिया येथील स्पर्धेत सहभागी होऊन भारताचे प्रतिनिधित्व करणार आहे. 

ही स्पर्धा कोरियातील चुनचेऑन शहर आणि तायक्वॅान्डो शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या तायक्वॅान्डो वॉन , मुजु पार्क ,जलाबोकदो राज्य , या जगातील प्रथम क्रमांकाच्या भव्य तायक्वॅान्डो क्रीडा संकुला मध्ये पार पडणार आहे. 

या स्पर्धेमुळे विद्यार्थ्यांना स्पर्धेत सहभागी होण्याबरोबरच इतर उच्च प्रशिक्षण यात फाइट, पुमसे, स्वसंरक्षण आणि आत्मरक्षा यांचे प्रशिक्षण ही घेता येणार आहे. या स्पर्धा दि. १० जुलै ते २३ जुलै , २०२४ या दरम्यान द. कोरिया येथे संपन्न होणार आहेत.  

तसेच कोरियायील जागतिक तायक्वॅान्डो मुख्य प्रशिक्षण केंद्रास भेट देणार आहे. कोरिया स्पर्धेतील सहभाग म्हणजे तेथील तायक्वॅान्डो प्रशिक्षण , माहिती आत्मसात करण्याबरोबरच जागतिक  हेड क्वार्टर (कुक्कीवॉन) पाहण्याची अत्यंत दुर्मिळ संधी या संघास मिळणार आहे. 

या संघास जेएसटीएआरसी चे प्रमुख आणि तायक्वॅान्डो तज्ज्ञ मास्टर निलेश जालनावाला यांचे मार्गदर्शन आणि प्रोत्साहन लाभले आहे.



Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.