किल्ले सामानगडावर शिवराज्याभिषेक सोहळा शिवमय वातावरणात पार पडला

 किल्ले सामानगडावर शिवराज्याभिषेक सोहळा शिवमय वातावरणात पार पडला



शंभुराजे विकास मंच व हील रायडर्स चा उपक्रम

कोल्हापूर ७ प्रमोद पाटील 

शिवराज्याभिषेक साडेतीनशे वर्षे पूर्ण झाली गेली दहा वर्ष विविध किल्ल्यांवर राज्याभिषेक सोहळा आयोजित करण्याची परंपरा कै. वस्ताद सुरज ढोली यांनी सुरुवात केली तीच परंपरा कायम राखत शंभूराजे मर्दानी खेळ विकास मंच व हिला रायडर्स एडवेंचर फाउंडेशन यांच्यावतीने किल्ले सामान गडावर विविध कार्यक्रमानी हा सोहळा मोठ्या उत्साहाने शिवमय वातावरणात पार पडला 


शिवराज्याभिषेक दिनी सकाळी गड पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली मुख्य दरवाज्यापासून शिव यात्रा शिवमुर्ती बरोबरच मर्दानी खेळाचे मावळे हातामध्ये तलवार दांडपट्टा विटा घेऊन सहभागी झाले होते त्याचबरोबर महिला भगिनी पारंपारिक साडी नेसून पुरुष मंडळी पारंपारिक वेशभूषा करून या शिव यात्रेमध्ये मोठ्या उत्साहाने सहभागी झाले होते या मिरवणुकीमध्ये गिर्यारोहक स्थानिक नागरिक निसर्गप्रेमी मंडळी व मान्यवर मंडळी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते 

बाल शिवाजी चा वेष परिधान करून कु. रायभान ढोली हा सहभागी झाला होता त्यांनी सर्वांचा उत्साह वाढवला त्याचबरोबर युवराज साळुंखे यांनी राजर्षी शाहू महाराजांचा वेश परिधान केला होता 

सदरची शिव यात्रा गडावरील मुख्य ठिकाणांना भेटी देऊन भवानी मंदिर येथे पोहोचली त्याचवेळी शिवरायांच्या जयघोषाने सारा किल्ला दुमदुमून गेला 

भवानी देवी अभिषेक व पूजा झाल्यानंतर शिव अभिषेक सुरुवात झाली प्रथमेश गुरव सिद्धेश उपारे या गुरुजींनी विविध मंत्र्यांद्वारे शिव पुतळ्यास पंचामृत अभिषेक व अकरा किल्ल्यांवरून आणलेल्या पवित्र जलानी अभिषेक घालण्यास सुरुवात केली 

सुनील शिंत्रे साधना शिंत्रे शितल ढोली याच्या शुभ हस्ते अभिषेक व  पूजन करण्यात आले . प्रमोद पाटील अनिल मगर विनोद कंबोज, शेलार साहेब चंदन मिरजकर युवराज साळुंखे पीजी जाधव सुप्रिया दळवी यांच्या हस्ते ही अभिषेक करण्यात आला

कार्यक्रमास उपस्थित असणाऱ्या सर्व मर्दानी खेळाडू गिर्यारोहक निसर्गप्रेमी स्थानिक ग्रामस्थ यांच्या हस्ते अभिषेक व पूजन करण्यात आले त्यानंतर 

शंभुराजे मर्दानी खेळ विकास मंचतर्फे थरारक अशी मर्दानी खेळाची प्रात्यक्षिके सादर करण्यात आली या छोट्या शिलेदारांनी सर्वांची वाहवा मिळवली याच वेळी राज्याभिषेक दिनी महिलांसाठी विविध अडचणी दूर करण्यासाठी जिव्हाळा महिला सेवा संस्थेची स्थापना करण्यात आली या शुभारंभ प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष सुप्रिया दळवी उपाध्यक्ष शितल डोली श्रद्धा नाईकवडी व इतर भगिनी उपस्थित होत्या 

हा सोहळा पार पाडण्यासाठी स्वस्तिक कन्स्ट्रक्शन सारथी फाउंडेशन सह्याद्री एडवेंचर्स श्री श्री डेव्हलपर्स समिट अडवेंचर यांचे बहुमूल्य सहकार्य लाभले 

सदर सोहळा यशस्वीरित्या पार पडण्यासाठी प्रमोद पाटील शितल ढोली व युवराज साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली 

शिवतेज पाटील संकेत पाटील भिकाजी शिंगे अथर्व सूर्यवंशी प्रफुल गुरव सिद्धू  उपारे ओंकार निगुडे निलेश सातार्डेकर अमर सातार्डेकर प्रथमेश गुरव यानी परिश्रम घेतले

Tags

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.