गडहिंग्लज येथील अभियांत्रिकी प्रवेश मार्गदर्शन सेमिनारला उत्स्फूर्त प्रतिसाद

 गडहिंग्लज येथील अभियांत्रिकी प्रवेश मार्गदर्शन सेमिनारला उत्स्फूर्त प्रतिसाद







कोल्हापूर (गडहिंग्लज) ५ प्रमोद पाटील 


अभियांत्रिकी क्षेत्र सतत विस्तारत असून बदलत्या काळाची गरज ओळखून योग्य शाखेची निवड करणे गरजेचे आहे. उत्तम करिअरसाठी अभियांत्रिकी पदवी हा सर्वोत्तम असल्याचे  प्रतिपादन डी. वाय. पाटील शिक्षण संस्थेचे कार्यकारी संचालक डॉ. अनिलकुमार गुप्ता यांनी केले. 



   डी. वाय पाटील अभियांत्रिकी महाविद्यालय, कोल्हापूरच्यावतीने गडहिंग्लज येथे आयोजित अभियांत्रिकी प्रवेश प्रक्रिया मार्गदर्शन सेमिनारमध्ये ते बोलत होते. श्री गणेश सांस्कृतिक सभागृहात झालेल्या या सेमिनारला विद्यार्थी व पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. यावेळी महाविद्यालयाचे रजिस्ट्रार डॉ लितेश मालदे यांनी प्रास्ताविकात महाविद्यालयाच्या अचिवमेंट, तेथील सुविधा, अभ्यासक्रम, प्लेसमेंट कामगिरी यांची माहिती दिली.


    मुख्य मार्गदर्शक डॉ गुप्ता म्हणाले,   अलीकडे अभियांत्रीकीकडे विद्यार्थ्यांचा ओढा वाढला आहे. मात्र यामधील नेमकी कोणती शाखा निवडायची याबाबत संभ्रम असतो. विद्यार्थ्यांनी आपली आवड, बाजाराची गरज व संधी ओळखून योग्य शाखा निवडावी.


    सीईटीचा निकाल 10 जून रोजी लागणार  असून आठवड्याभरातच प्रवेश अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरु होईल. यामध्ये कोणती शाखा निवडावी, अर्ज कसा भरावा, केंद्रीय प्रवेश प्रक्रिया कशी असेल, कोणती कागदपत्रे लागतील, सीट अलोटमेंट, याबाबतही डॉ. गुप्ता यांनी मार्गदर्शन केले.यावेळी विद्यार्थ्यांचे प्रश्न व शंकांचे निरसन डॉ गुप्ता, डॉ मालदे, प्रा. रवींद्र बेन्नी, प्रा. योगेश चौगुले, प्रा. विराज पसारे यांनी केले.


 यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून श्री. जे. बी.बारस्कर, डॉ नागेश पट्टणशेट्टी, तहसीलदार श्री.ऋषिकेट शेळके, श्री एस.बी.पाटील, श्री अमोल पाटील आदी उपस्थित होते. 


 सूत्रसंचालन प्रा. एस. झेड. भाई आणि प्रा. तिलोत्तमा पाडळे यांनी  केले, तर आभार प्रा. रविंद्र बेन्नी यांनी मानले. प्रा.योगेश चौगुले आणि प्रा.विराज  पसारे,  डॉ. कीर्ती महाजन, शामल देसाई यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले.


.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.