झोपडपट्टीधारक कार्डच्या कामात महापालिका प्रशासन अॅक्शन मोडवर; झोपडपट्टी व्याप्त क्षेत्र रहिवास विभागात समाविष्ट करण्यास शासनाची मान्यता

 झोपडपट्टीधारक कार्डच्या कामात महापालिका प्रशासन अॅक्शन मोडवर; झोपडपट्टी व्याप्त क्षेत्र रहिवास विभागात समाविष्ट करण्यास शासनाची मान्यता



राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी दिल्या होत्या सूचना  


कोल्हापूर, दि. १० प्रमोद पाटील 

 गेल्या अनेक वर्षापासून कोल्हापूर शहरातील झोपडपट्टीधारकांचा प्रश्न ऐरणीवर येत आहे. झोपडपट्टीधारकांचे राहणीमान सुधारावे, त्यांना मुलभूत सोई सुविधा मिळाव्यात यासाठी शिवसेना प्रयत्नशील आहे. झोपडपट्टी धारकांचा मूळ प्रश्न असलेल्या झोपडपट्टीधारक कार्ड बाबत राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष श्री.राजेश क्षीरसागर यांच्या सुचनेनंतर महानगरपालिका प्रशासन अॅक्शन मोडवर आल्याचे दिसून येत असून, झोपडपट्टीधारकांच्या कार्डच्या कामास प्रशासनाकडून गती देण्यात आली आहे.   

राज्यातील प्रत्येक शहरात झोपडपट्ट्यांचे अस्तित्व आज ठळकपणे जाणवते. याला कोल्हापूर शहरही अपवाद नाही. येथे राहणा-या नागरिकांना सामान्य नागरिकांना मिळणा-या किमान सोयी सुविधा मिळत नाहीत. मग मालकीहक्काचा प्रश्न तर दूरच राहिला. गेली काही दशके झोपडपट्टीधारकांच्या मालकीहक्काचा प्रश्न नेहमीच ऐरणीवर येत आहे. झोपडपट्टीधारकांचे जगणे बदलून त्यांच्याही वाट्याला चांगले आयुष्य यावे यासाठी शासन सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. झोपडपट्टीधारकांना प्रॉपर्टी कार्ड मिळणे गरजेचे आहे. पण झोपडपट्टीकार्डबाबत महापालिका प्रशासन निष्क्रिय ठरले असून, आवश्यक अॅक्शन प्लॅन तयार करून येत्या ४५ दिवसात मोजणी पूर्ण करा. याची जबाबदारी शहर अभियंता यांच्यावर निश्चित करा आणि १५ दिवसांच्या मुदतीने याचा पाठपुरावा करण्याच्या सूचना दिल्या राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी श्री.राजेश क्षीरसागर यांनी महापालिका अधिकाऱ्यांना दिल्या होत्या. दि.१० जून रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात सदर बैठक पार पडली होती. 

गेल्या आठवड्यात झालेल्या बैठकीनंतर श्री.राजेश क्षीरसागर यांच्या सुचनेनुसार महानगरपालिका प्रशासनाकडून कार्यवाही सुरु करण्यात आली. कनाननगर येथील झोपडपट्टी व्याप्त क्षेत्र सार्वजनिक - निमसार्वजनिक विभागातून वगळून महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम १९६६ चे कलम ३७ अन्वये फेरबदलाची कार्यवाही करून रहिवास विभागात समाविष्ठ करण्यास शासनाने तत्वत: मान्यता दिली आहे. यासह या क्षेत्रफळातील झोपडपट्टी धारकांची संख्या, प्रत्येक लाभधारकांच्या घरांचे भोगवटा क्षेत्रफळासह एकूण झोपडपट्टी लाभार्थी भोगवटाधारकांची यादी मंजूर नकाशाच्या प्रत सादर करण्यात आल्या आहेत. त्यामुळे आगामी काळात झोपडपट्टी धारकांना प्रॉपर्टीकार्ड मिळण्याचा मार्ग सुकर झाला आहे. 





Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.