विझार्ड चेस क्लब या आधुनिक बुद्धिबळ प्रशिक्षण केंद्राचे दिमाखात शुभारंभ

 विझार्ड चेस क्लब या आधुनिक बुद्धिबळ प्रशिक्षण केंद्राचे दिमाखात शुभारंभ



कोल्हापूर १२ प्रमोद पाटील 
  कोल्हापूरचा आंतरराष्ट्रीय बुद्धिबळपटू अनिश गांधी प्रणित विझार्ड चेस क्लबच्या वतीने कोल्हापूरातील राजारामपूरी 9 वी गल्लीमध्ये आधुनिक बुद्धिबळ प्रशिक्षण केंद्राचे शुक्रवारी अक्षय तृतीयाच्या मुहूर्त साधत दिमाखात उद्घाटन झाले. चेस असोसिएशन कोल्हापूरच्या मान्यतेने सुरू करण्यात आलेल्या या आधुनिक प्रशिक्षण केंद्राचे उद्घाटन बुद्धिबळातील कोल्हापूरचे आंतरराष्ट्रीय पंच व महाराष्ट्र बुद्धिबळ संघटनेचे सहसचिव भरत चौगुले यांच्या हस्ते फित कापून, दीप प्रज्वलन करून व बुद्धिबळाच्या पटावर चाल करून करण्यात आले.यावेळी कोल्हापुरातील नामांकित बुद्धिबळ प्रशिक्षक उत्कर्ष लोमटे,प्रीतम घोडके,धीरज वैद्य, सोहम खासबागदार,ऋतुराज भोकरे,सुयश जोशी,सुरज वैद्य, अनिशचे काका उद्योजक प्रदीप गांधी वडील प्रशांत व आई प्रतिमा,बहिण साक्षी व बंधू साहिल यांच्यासह मित्र परिवार,बुद्धिबळपटू व पालक उपस्थित होते‌...या उद्घाटन प्रसंगानिमित्त बुद्धिबळपटूसाठी अतिजलद बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.अग्रमानांकित सोहम खासबागदार ने अपेक्षेप्रमाणे अजिंक्यपद पटकाविले राजदीप पाटीलला उपविजेतेपद तर ऋतुराज भोकरे ला तृतीय स्थान मिळाले.या तिघा विजेत्यांना चषक देऊन गौरवण्यात आले.
शुभारंभाचा विशेष उपक्रम म्हणून सोमवार दिनांक 13 मे ते 16 मे पर्यंत चार दिवसाचे आंतरराष्ट्रीय गुणांकन प्राप्त बुद्धिबळपटूंसाठी प्रशिक्षण शिबीर आयोजित केले आहे‌.दररोज सहा तास चालणाऱ्या या प्रशिक्षण शिबिरासाठी होतकरू,उदयन्मुख आंतरराष्ट्रीय गुणांकन प्राप्त बुद्धिबळपटूना आमंत्रित केले आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.