महालक्ष्मी एक्सप्रेसचा डबा कमी करून एक्सप्रेसचा धबधबा कमी करू नये' : लोकप्रतिनिधींनी खंबीर पाठपुरावा करावा- समाजमन बहुउद्देशीय संस्थेची मागणी

महालक्ष्मी एक्सप्रेसचा डबा कमी करून एक्सप्रेसचा धबधबा कमी करू नये' : लोकप्रतिनिधींनी खंबीर पाठपुरावा करावा-  समाजमन बहुउद्देशीय संस्थेची मागणी





कोल्हापूर, २२ प्रमोद पाटील 

 कोरोना काळात  कोल्हापुरातून सुटणारी सह्याद्री एक्सप्रेस बंद केली आहे तर आता महालक्ष्मी एक्सप्रेस चा एक डबा कमी करून रेल्वे प्रशासनाने निर्णय घेतला त्याच्या संतप्त प्रतिक्रिया सगळीकडे उमटत आहेत. समाजमन संस्थेचे महेश गावडे यांनी कोल्हापूर ऑनलाईन शी याबद्दल आपली मते मांडली.

महालक्ष्मी एक्सप्रेस चा एस 11 हा स्लीपर डब्बा 25 मे पासून कमी करण्यात येणार आहे, अशी माहिती मध्य रेल्वे मुंबई प्रवासी सल्लागार समिती सदस्य शिवनाथ बियानी यांनी दिली. या गाडीच्या वेटिंगची संख्या लक्षात घेता या गाडीने प्रवास करणाऱ्या प्रवेशांवर अन्याय करणारा हा निर्णय असल्याचे त्यांनी सांगितले आहे. मध्य रेल्वे पुणे विभागात अधिक उत्पन्न मिळवून देणाऱ्या गाड्यांच्या यादीत या गाडीचा समावेश होतो. पूर्वी या गाडीस आयसीएफचे डबे असताना स्लीपरचे 13 डबे होते. आता 

एलएचबीचे डबे आल्याने दोन डब्यांची संख्या कमी करून स्लीपरचे 11 डबे ठेवण्यात आले होते. त्यातही आता 25 मे पासून स्लीपरचा एक डबा कमी करण्याचा रेल्वे प्रशासनाचा निर्णय हा प्रवाशांवर अन्याय करणारा आहे. त्यामुळे हा निर्णय मागे घ्यावा अशी समाजमन संस्थेची मागणी आहे. 

कोल्हापूर मधील छत्रपती शाहू टर्मिनस हे पश्चिम महाराष्ट्रातील शेवटचे जंक्शन आहे. दिली, मुंबई, पुणे, दक्षिण भारत आदी ठिकाणाहून लोक नोकरी, धंदा आणि पर्यटनसाठी कोल्हापूर मध्ये ये, जा करत असतात. रेल्वे मधून तर स्वस्तात मस्त प्रवास करण्यासाठी अनेक प्रवासी उत्सुक असतात. मात्र, कोल्हापूरहून सुटणारी सह्याद्री एक्सप्रेस कोरोना काळात बंद झाली. तर आता येत्या 25 मे पासून महालक्ष्मी एक्सप्रेस स्लीपर कोचचा एक डबा कमी करण्यात येणार आहे. त्यामुळे मे महिन्याच्या सुट्टीमध्ये कोल्हापुरातून त्यांच्या मामाच्या गावाला जाणाऱ्या मुलांचा आणि मुंबई, पुणे किंवा अन्य ठिकाणाहून रेल्वेने कोल्हापूरमधील मामाच्या गावाला येणाऱ्या मुलांचा हिरमोड होणार आहे. कारण 

 चार महिने आधी रिझर्वेशन करूनही लोक आरएसी आणि वेटिंग मधून प्रवास करतात. आजही या गाडीला 200 पेक्षा जास्त वेटिंग असते. 

ही गाडी कोल्हापूर मुंबई कोल्हापूर महालक्ष्मी एक्सप्रेस म्हणून प्रवास केल्यानंतर कोल्हापूर मधून ही गाडी कोल्हापूर मधून ही गाडी तिरुपती हरिप्रिया एक्सप्रेस म्हणून धावते. तिरुपतीहून परतीच्या प्रवासासाठी आजही या गाडीचे तिकिटे उपलब्ध होत नाहीत. 

मे महिन्यात तर प्रवाशांची रेल्वेला मोठी गर्दी असते. मात्र 25 मे पासून कमी करण्यात येणाऱ्या या डब्यामुळे अनेक लोकांची मोठी गैरसोय होणार आहे.  महालक्ष्मी एक्सप्रेस ही कोल्हापूरच्या विकासाची एक्सप्रेस आहे. त्यामुळे या एक्सप्रेसचा एक डबा कमी करून महालक्ष्मी एक्सप्रेसचा धबधबा, नावलौकिक कमी करू नये, हीच माफक अपेक्षा आहे. अर्थात, प्रवाशी यांची आत्यंतिक गरज लक्षात घेऊन

तिचे डबे कमी करून रेल्वे प्रवाशांची हक्काची जागा  हिरावून घेऊ नये, पर्यायाने रेल्वेतून बऱ्याच मुलांना मामाच्या गावाला येण्या आणि जाण्याचा निखळ आनंद हिरावून घेऊ नये, 

 अशी अपेक्षा आणि कळकळीची विनंती रेल्वे प्रशासनाकडे कोल्हापूर मधील समाजमन सामाजिक संस्था करत आहे तसेच या प्रश्ननी लोकप्रतिनिधी देखील लक्ष घालून महालक्ष्मी एक्सप्रेसचा डबा कमी करण्यात येऊ नये, यासाठी खंबीर पाठपुरावा करावा अशी मागणी समाजमन संस्था करत आहे.

महालक्ष्मी एक्सप्रेस ही विकासाच्या रुळावर कायम स्वरुपी राहिली पाहिजे. तिचा आणखी 1 डबा कमी करणे म्हणजे तिचे अस्तित्व कमी करणे किंवा महत्व कमी करण्याचा प्रयत्न होईल, 

अनेक आर्थिक मागास आणि गरजू प्रवासी यांना  ती वरदान ठरत आहे, हेही इथे लक्षात घ्यायला

 हवेय. एकाच रेल्वेमध्ये एकाचवेळी अनेक कुटुंबांना जोडणारी, नव्या नात्यांना जन्म देणारी आणि सुखाचा प्रवास करण्याच्या वाटचालीतील ही एक्सप्रेस अखड रहायला हवीय. ती दुभगता गामा नये, ही जास्त नाही पण रास्त अपेक्षा आहे. या पेक्षा आवास्तव काही मागणे नाही, अशी प्रतिक्रिया समाजमन संस्था अध्यक्ष महेश गावडे यांनी दिली आहे.

Tags

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.