उजलाईवाडी येथे मर्दानी खेळ शिबिराची सांगता

उजलाईवाडी येथे मर्दानी खेळ शिबिराची सांगता


कोल्हापूर १४ प्रमोद पाटील 

शहिद भगतसिंग तरुण मंडळ व शंभूराजे मर्दानीखेळ विकास मंच याच्या संयुक्त विद्यमाने उजलाईवाडी येथे स्थानिक मुला मुलींना शिवकालीन युद्ध कलेची माहिती व्हावी, स्वसंरक्षणाकरिता ती त्यांना शिकता यावी शिवकालीन हत्यारांची ओळख व्हावी मुलांच्या सुप्त गुणांना वाव मिळावा या मुख्य उद्देशाने गेली अनेक वर्षे या शिबिराचे आयोजन करण्यात येते 

प्रति वर्षाप्रमाणे यंदाही या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते उजळाईवाडी परिसरातील मुला मुलींनी या शिबिरास उस्फुर्त प्रतिसाद देऊन सहभाग नोंदवला गेली दहा दिवस चालू असलेले शिबिर आज संपन्न झाले आहे 

सदर शिबिरामध्ये मर्दानी खेळातील लाठीकाठी दांडपट्टा तलवार विटा अशा विविध प्रकारचे प्रशिक्षण व प्रात्यक्षिक सदर मुलांना देण्यात आले 

शहीद भगतसिंग तरुण मंडळ यांनी आयोजित केलेल्या या शिबिरामध्ये कै, वस्ताद सुरज ढोली यांनी प्रशिक्षित केलेल्या प्रशिक्षकांनी मार्गदर्शन केले 

कै.वस्ताद सूरज ढोली यांनी मर्दानी खेळाचा प्रसार व्हावा या करीता विविध भागात आशा शीबिराची सुरवात केली होती ती सातत्यांनी सुरू ठेवण्याचे कार्य भगतसिंह मंडळाने केले आहे

प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते शस्त्र पूजन, व भगत सिंग व वस्ताद सूरज ढोली याच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले

शिबिराचा समारोप अभिनेते आनंद काळे,कर्नल शिवानंद वराडकर,गिर्यारोहक विनोद कंबोज,पर्यावरण अभ्यासक उदय गायकवाड,लक्षमन केसरकर, आनंदा जंगम, हील रायडर्स चे प्रमोद पाटील व शंभूराजे मर्दानी खेळ मंच च्यां अध्यक्ष्या शीतल ढोली प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या

आनंद काळे,कर्नल वराडकर,विनोद कंबोज व उदय गायकवाड यांनी मुलांना मार्गदर्शन केले संस्थेचे अध्यक्ष अवधूत पाटील यांच्या बरोबरच,शरद शिंदे ,हेमंत खामकर,रोहन गायकवाड,नितीन केसरकर यांनी आयोजन केले

अभिजित इंगळे,ओमकार निगुटी,ज्योती जाधव यांनी प्रशिक्षण दिले याना मंचच्या अध्यक्षा शीतल ढोली याच मार्गदर्शन लाभल 

सहभागी शिबिरार्थींना प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते प्रमाणपत्र देण्यात आले

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.