शैक्षणिक विकासाच्या संतुलनाच्या आधारावर नवीन भारताचे निर्माण करणे हेच भाजपचे स्वप्न - नितीन गडकरी, केंद्रीय दळणवळणमंत्री

 शैक्षणिक विकासाच्या संतुलनाच्या आधारावर नवीन भारताचे निर्माण करणे हेच भाजपचे स्वप्न  - नितीन गडकरी, केंद्रीय दळणवळणमंत्री 





कोल्हापूर 05 ( राजेंद्र मकोटे) 

भाजप सरकारच्या गेल्या १० वर्षांच्या काळात कृषीपासून ते प्रत्येक क्षेत्रात भारताचा विकास झाला आहे. संरक्षणाच्या क्षेत्रात जिथे आपण सर्वच आयात करायचे तिथे आज आपण अनेक देशांना शस् त्रे निर्यात करतो. यापुढील काळात सगळ्यांचा समतोल विकास करत असतांना सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक विकासाचे संतुलन याच्या आधारावर नवीन भारताचे निर्माण करणे हेच भाजपचे स्वप्न आहे. भारत आत्मनिर्भर होण्यासाठी, भारत विश्‍वगुरु होण्यासाठी भाजपचे प्रयत्न आहेत, असे प्रतिपादन केंद्रीय दळणवळणमंत्री नीतीन गडकरी यांनी केले.

ते महासैनिक दरबार हॉल’ येथे उद्योजक, अधिवक्ता, लेखापरीक्षक, व्यावसायिक यांच्यासाठी आयोजित मार्गदर्शनात बोलत होते. या प्रसंगी भाजप खासदार धनंजय महाडिक, कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक, सुनील देवधर यांसह भाजप, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. सूत्रसंचालन ‘बी’ न्यूजचे संपादक श्री. चारुदत्त जोशी यांनी केले.   

कोल्हापूर जिल्ह्याने त्यांच्या जिल्ह्यातील क्षमता ओळखून त्याप्रमाणे मोठे व्यावसाय उभे करण्याचा प्रयत्न केले पाहिजेत. जसे हुपरी येथील चांदी उद्योगासाठी ‘सिल्व्हर डिझार्झन इन्स्टिट्यूट’, इचलकरंजी येथे टेक् सटाईल डिझाईन इन्स्टिट्यूट’ चालू करण्याची आवश्यकता आहे. इथे मोठ्या प्रमाणात ‘फाऊंड्री’, तसेच अभियांत्रिकी कारखाने असल्याने कोल्हापूर जिल्हा दुचाकी-चारचाकी गाड्यांचे भाग बनवणारे मोठे केंद्र होऊ शकते. कोल्हापूर येथे मोठ्या प्रमाणात साखर कारखाने असल्याने येथे इथेनॉल उद्योग मोठ्या प्रमाणात चालू होऊ शकतो. याचा मोठा लाभ शेतकर्‍यांसाठी होऊ शकतो. कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकर्‍यांनी 

 नवनवीन तंत्रज्ञानाचा उपयोग करून आपण विकासाचे ‘मॉडेल’ सिद्ध केले पाहिजे. भारतातील शेवटचा व्यक् ती केंद्रबिंदू मानून आपण कृती केली पाहिजे. येणार्‍या काळात भारतातील गरीबी दूर करायचे आहे, येणार्‍या काळात भारताला सुखी-समृद्ध बनवायचे आहे.

नितीन गडकरी यांच्याशी झालेल्या प्रश्न उत्तरातून आलेली उत्तरे अशी

 यापुढील काळ हा ‘हायड्रोजन’ वायू आणि द्रवरूप चालणार्‍या इंधनाचा आहे. त्यामुळे त्याच्या निर्मितीसाठी आपण प्रयत्नशील असले, पाहिजे. 

चांगल्याप्रकारचे आणि दीर्घपल्ल्यांच्या रस्त्यांसाठी चारचाकी वाहनांची वेगमर्यादा ८० किलोमीटरपेक्षा अधिक वाढवली पाहिजे यासाठी मीही सहमत आहे; मात्र देशात वाढत्या अपघातांची संख्या पहाता सध्यातरी ते शक्य नाही. वेग वाढवण्याच्या प्रस्तावावर विविध राज्य आणि केंद्र यांची सहमत होत नाही.      यापूर्वी खासदार धनंजय महाडिक यांनी आपल्या भाषणामध्ये केंद्र आणि राज्य सरकारच्या भक्कम आर्थिक   सहकार्यामुळे कोल्हापूर आता चौफेर विकसित करीत असल्याचे नमूद केलेतर प्राध्यापक संजय मंडलिक यांनी यावेळी बोलताना कोल्हापुरातून पश्चिम महाराष्ट्राचे विकासाचा नवा आयाम आता गतीने पुढे जाईल असा विश्वास व्यक्त केला .या कार्यक्रमासाठी कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्स ,गोशीमा स्मॅक  मॅक  कोल्हापूर इंजिनिअरिंग असोशियशत 'कोल्हापूर आर्किटेक असोसिएशन विविध औद्योगिक सामाजिक संस्थांपूर्वी संघटनांचे प्रतिनिधी पदाधिकारी सह टायटनचे प्रसाद कामत पुणे जिल्हा बँकेचे श्रीकांत पोतनीस सुरेश जैन विश्वजित कुलकर्णी राजु पाटील, रोटरी चे उदय पाटील सत्यजित उर्फ नाना कदम क्रिडाई चे  जयेशभाई कदम सीमा जोशी संतोष कुलकर्णी पचगंगा राजाराम शिपुगडे सह मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते .

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.