गाव चलो अभियानाच्या माध्यमातून केंद्र आणि राज्य सरकारच्या योजना घरोघरी पोहचवा, तसेच भाजपचे संघटन मजबूत करा, माजी गृहराज्यमंत्री कृपाशंकर सिंह यांचे आवाहन

 गाव चलो अभियानाच्या माध्यमातून केंद्र आणि राज्य सरकारच्या योजना घरोघरी पोहचवा, तसेच भाजपचे संघटन मजबूत करा, माजी गृहराज्यमंत्री कृपाशंकर सिंह यांचे आवाहन



 कोल्हापूर दि.4  प्रमोद पाटील 

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून देशभर वेगाने काम सुरू आहे. आज राज्याचे माजी गृहराज्यमंत्री कृपाशंकर सिंह यांचा कोल्हापूर जिल्हा दौरा झाला. त्यातून  भाजपा जिल्हा कार्यालयामध्ये कोल्हापूर, हातकणंगले आणि सातारा लोकसभेची एकत्रित क्लस्टर बैठक झाली. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते भारतमातेचे प्रतिमा पूजन करून बैठकीला सुरुवात करण्यात आली. भाजप जिल्हाध्यक्ष सर्वश्री विजय जाधव, राजवर्धन नाईक निंबाळकर, राहुल देसाई यांच्या हस्ते पुष्पगुच्छ आणि शाल देऊन, कृपाशंकर सिंह यांचे स्वागत करण्यात आले. 



महेश जाधव यांनी कृपाशंकर सिंग यांचे स्वागत करून, त्यांच्या कार्याबाबत माहिती दिली. त्यानंतर खासदार धनंजय महाडिक यांनी लालकृष्ण अडवाणी यांना भारतरत्न पुरस्कार मिळाल्याबद्दल, त्यांचा अभिनंदनाचा ठराव पारित केला. तसेच गाव चलो अभियान यशस्वी करण्यासाठी आयोजित केलेल्या बैठकीचा उद्देश स्पष्ट केला. प्रत्येक विधानसभा क्षेत्रातून, भाजपचे प्रमुख नेते आणि पदाधिकारी यांची गाव चलो अभियानासाठी गावनिहाय नियुक्ती निश्चित केली आहे. हे अभियान विधानसभा आणि लोकसभा क्षेत्रामध्ये प्रभावीपणे राबवले जाईल, अशी त्यांनी ग्वाही दिली. तर भाजपचे पश्चिम महाराष्ट्र संघटन मंत्री मकरंद देशपांडे यांनी उपस्थित 


तिन्ही लोकसभा विस्तारक, पालक यांच्या कार्याचा अहवाल घेत,  विस्तारक आणि पदाधिकारी यांच्यात समन्वय ठेवून, काम करण्याच्या सूचना केल्या. केंद्रातील मोदी सरकारच्या योजना तळागाळापर्यंत पोचवण्यासाठी तसेच भाजपकडून आणि सरकारकडून जनतेच्या कोणत्या अपेक्षा आहेत, हे जाणून घेण्यासाठी गाव चलो अभियान उपयुक्त ठरेल, असा विश्‍वास खासदार महाडिक यांनी व्यक्त केला. तर कृपाशंकर सिंह यांनी तिन्ही लोकसभेचा स्वतंत्र आढावा घेत  पदाधिकार्‍यांना सूचना केल्या. 


२०२४ च्या लोकसभा निवडणुकीसाठी, गाव चलो अभियान प्रभावी माध्यम असून, सर्वांनी जास्तीत जास्त लोकांच्या गाठीभेटी घेतल्या पाहिजेत, त्यांच्याशी संवाद साधला पाहिजे असेही सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी देशासाठी इतका वेळ देत असतील, तर  विस्तारक, पालक आणि भाजपाचे एक पदाधिकारी या नात्याने, देश कार्याच्या समर्पित भावनेने संघटन मजबूत करण्यासाठी प्रत्येकाने कार्यरत रहावे, असे त्यांनी सांगितले. यानंतर पश्चिम महाराष्ट्र विभाग संयोजक योगेश बाचल यांनी उपस्थितांचे आभार मानले. या बैठकीला प्रदेश उपाध्यक्ष सुरेश हाळवणकर, धैर्यशील कदम, सातारा लोकसभा निवडणूक प्रमुख अतुलबाबा भोसले, पश्चिम महाराष्ट्र विभाग संयोजक योगेश बाचल, राहूल चिकोडे, समरजीतराजे घाटगे, अमल महाडिक, सत्यजित कदम यांच्यासह लोकसभा, विधानसभा विस्तारक, विधानसभा निवडणूक प्रमुख आणि पदाधिकारी उपस्थित होते.



Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.