पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठे व भव्य असे भीमा कृषी प्रदर्शन २०२४ मंडप शुभारंभ संपन्न

 पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठे व भव्य असे भीमा कृषी प्रदर्शन २०२४ मंडप शुभारंभ संपन्न 

येत्या २६ ते २९ जानेवारीला भीमा कृषी प्रदर्शन आयोजित 




कोल्हापूर १९ प्रमोद पाटील 

 शेतकऱ्यांना शेतीसाठी उपयुक्त असलेली माहिती मिळणारे व त्यांना शेतीसाठी आवश्यक असणारे साहित्य एकाच छताखाली खरेदी करता याव्यात यासाठी आयोजित करण्यात येत असलेले पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठे आणि भव्य असे भीमा कृषी प्रदर्शन २०२४ हे येत्या २६  ते २९ जानेवारी २०२४  या चार दिवसाच्या कालावधीत आयोजित करण्यात आले आहे. येथील मेरी वेदर मैदान येथे भरवण्यात आलेल्या या प्रदर्शनात देश-विदेशातील विविध नामांकित कंपन्यांचा सहभाग आहे या प्रदर्शनासाठी  भव्य मंडप उभा करण्यात आला आहे या मंडपाचा शुभारंभ आज खासदार धनंजय महाडिक यांच्या हस्ते करण्यात आले.


यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष विजय जाधव, भाजप ग्रामीण जिल्हाध्यक्ष राहुल देसाई माजी  जिल्हाध्यक्ष राहुल चिकोडे,रिलायन्स पोलिमर्स चे सत्याजित भोसले,नवग्रह रत्न  केंद्रच्या सौ.अनुश्री सत्यजित भोसले(मोतीवाला),  संग्रामसिंह निकम,माजी नगरसेवक महेश वासुदेव,राजसिंह शेळके,उमा इंगळे,इंद्रजित पाटील,चिखली सरपंच रघु पाटील,रिंकू देसाई,नंदू शिंदे,नितीन लोहार,प्रा. जे.पी.पाटील, डॉ.अजित शिंदे, डॉ.सुनील काटकर,सर्जेराव धनवडे,अशोक सिधनेर्ले,दिलीप दळवी,कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्सचे संचालक सुजित चव्हाण आदी उपस्थित होते.यावर्षी आयोजित प्रदर्शनामध्ये ४०० पेक्षा अधिक  स्टॉलचा समावेश आहे.त्याचबरोबर भागीरथी महिला संस्थेच्या मा. सौ अरुंधती महाडिक यांच्या नेतृत्वाखाली २०० बचत गटांना मोफत  देण्यात आले आहेत.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.