'खासदार चषक' भव्य खुल्या राष्ट्रीयस्तरावरील बुद्धिबळ स्पर्धां रविवारी कोल्हापुरात रंगणार

         'खासदार चषक' भव्य खुल्या राष्ट्रीयस्तरावरील बुद्धिबळ स्पर्धां रविवारी कोल्हापुरात रंगणार



कोल्हापूर 17 प्रमोद पाटील 
खासदार धनंजय महाडिक यांच्या पुढाकारातून क्रीडा पंढरी कोल्हापुरात होणाऱ्या 'खासदार महोत्सव' अंतर्गत आयोजित क्रीडा कुंभमेळाव्या मधील भव्य खुल्या राष्ट्रीयस्तरावरील 'खासदार चषक' बुद्धिबळ स्पर्धा कोल्हापुरात रविवारी दि.24 डिसेंबर रोजी आयोजित केल्या आहेत.

छत्रपती शिवाजी विद्यापीठाच्या जिजामाता कॉन्वेकेशन हॉलमध्ये आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धा चेस असोसिएशन कोल्हापूरच्या  मान्यतेने अनयाज् चेस क्लब ने आयोजित केल्या आहेत. या स्पर्धेसाठी एकूण एक लाख रुपयाच्या रोख बक्षीसा शिवाय 16 चषक व 57 मेडल्स स्वरुपात मुख्य 25 व उत्तेजनार्थ 75 अशी एकूण शंभर बक्षिस ठेवली आहेत.
 स्विस लीग पद्धतीने एकूण नऊ फेऱ्यात होणारी ही स्पर्धा जलद बुद्धिबळाच्या आंतरराष्ट्रीय नियमानुसार होणार आहे.स्पर्धा विजेत्यास रोख पंधरा हजार रुपये व भव्य आकर्षक चषक देवून गौरविण्यात येणार आहे. तर उपविजेत्यास रोख बारा हजार रुपयेसह आकर्षक चषक आणी तृतीय क्रमांकास रोख आठ हजार रुपये व आकर्षक चषक देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.अशी एकूण पहिल्या पंचवीस क्रमांकांना रोख बक्षिसे ठेवली आहेत.याशिवाय विविध वयोगटात 7, 9, 11, 13 व 15 वर्षाखालील मुलांना, साठ वर्षावरील ज्येष्ठ बुद्धिबळपटूंना,उत्कृष्ट महिला बुद्धिबळपटूंना, उत्कृष्ट दिव्यांग बुद्धिबळपटूंना व उत्कृष्ट बिगर गुणांकन प्राप्त बुद्धिबळपटूंना रोख रक्कमेसह चषक व मेडल्स स्वरुपात एकूण 75 उत्तेजनार्थ बक्षीसे देऊन गौरविण्यात येणार आहे.
रविवारी सकाळी साडेनऊ वाजता स्पर्धेच्या पहिल्या फेरीस प्रारंभ होईल.इच्छुक बुद्धिबळपटूनी 23 डिसेंबर पर्यंत आपली नावे नोंदवावीत.ऐनवेळी स्पर्धा स्थळी प्रवेश दिला जाणार नाही.स्पर्धेत भाग घेण्यासाठी व अधिक माहितीसाठी खालील व्यक्तींशी संपर्क साधावा.
1)  भरत चौगुले - 7620067251
2)  मनीष मारूलकर - 9922965173
3)  आरती मोदी - 8149740405
4) रोहित पोळ - 9657333926
धनंजय महाडिक युवाशक्तिचे अध्यक्ष  पृथ्वीराज महाडिक, युथ आयकॉन कृष्णराज महाडिक,स्पर्धा संचालक उमेश पाटील,आंतरराष्ट्रीय पंच भरत चौगुले,स्पर्धा समन्वयक मनीष मारुलकर व उत्कर्ष लोमटे यांनी या पत्रकाद्वारे माहिती दिली आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.