अमॅच्युर, जलद व अतिजलद जिल्हा निवड बुद्धिबळ स्पर्धेत कोल्हापूरचा आदित्य सावळकर अजिंक्य

 अमॅच्युर, जलद व अतिजलद जिल्हा निवड बुद्धिबळ स्पर्धेत कोल्हापूरचा आदित्य सावळकर अजिंक्य, इचलकरंजीचा रवींद्र निकम उपविजेता तर कोल्हापूरचा शंतनु पाटील तृतीय स्थानी




कोल्हापूर ३ प्रमोद पाटील 

 जयलक्ष्मी सांस्कृतिक भवन नागाळा पार्क येथे चेस असोसिएशन कोल्हापूरने आयोजित केलेल्या कोल्हापूर जिल्हा अमॅच्युर,जलद व अतिजलद निवड बुद्धिबळ स्पर्धा संपन्न झाल्या. स्विस् लीग पद्धतीने एकूण सहा फेऱ्यात घेण्यात आलेल्या या स्पर्धेत अंतिम सहाव्या फेरीनंतर अग्रमानांकित कोल्हापूरचा आदित्य सावळकर, द्वितीय मानांकित इचलकरंजीचा रवींद्र निकम व पाचवा मानांकित कोल्हापूरचा शंतनू पाटील या तिघांचे समान पाच गुण झाले होते. सरस बकोल्झ टायब्रेक गुणामुळे आदित्यला अजिंक्यपद मिळाले. रवींद्रला उपविजेतेपदावर तर शंतनुला तृतीय स्थानावर समाधान मानावे लागले.आठवा मानांकित इचलकरंजीच्या अथर्व तावरेला साडेचार गुणासह चौथे स्थान मिळाले.स्पर्धा विजेत्यांना रोख बक्षिसे व चषक देऊन गौरविण्यात आले.

या स्पर्धेतून ठाणे येथे 9 व 10 डिसेंबर रोजी होणाऱ्या महाराष्ट्र राज्य अमॅच्युर निवड बुद्धिबळ स्पर्धा आणि मुंबई येथे 16 व 17 डिसेंबर रोजी होणाऱ्या महाराष्ट्र राज्य जलद व अतिजलद निवड बुद्धिबळ स्पर्धेसाठी कोल्हापूर जिल्ह्याचा चार जणांचा निवडण्यात आलेला संघ पुढीलप्रमाणे .

1) आदित्य सावळकर कोल्हापूर 2) रवींद्र निकम इचलकरंजी 3) शंतनु पाटील कोल्हापूर 4) अथर्व तावरे इचलकरंजी

स्पर्धा यशस्वी होण्यासाठी भरत चौगुले,उत्कर्ष लोमटे,आरती मोदी, मनीष मारुलकर,अमित मोदी व डॉ.हरीश पाटील यांनी विषेश परिश्रम घेतले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.