टिप्पर चालकांच्या उपोषणाचा चौथा दिवस ; उपोषणकर्त्यांची तब्येत खालावली

 


टिप्पर चालकांच्या उपोषणाचा चौथा दिवस ; उपोषणकर्त्यांची तब्येत खालावली



प्रशासन बेकायदेशीर वागत असल्याचा आप चा आरोप


उद्या महापालिकेसमोर होणार महाघंटानाद

कोल्हापूर १० प्रमोद पाटील 

टिप्पर चालकांना किमान वेतन मिळावे यासाठी आमरण उपोषण सुरु केले गेले आहे. उपोषणाच्या चौथ्या दिवशी दोन उपोषणकर्त्यांची तब्येत खालवल्याने त्यांना रुग्णालयात हलवावे लागले.


महापालिकेने पत्रक काढून किमान वेतन देण्याची जबाबदारी कंत्राटदाराची असल्याचे सांगत हात झटकण्याचा प्रयत्न केला आहे. परंतु कंत्राटी कामगार अधिनियम, 1970 नुसार मूळ मालक (प्रिंसिपल एम्प्लॉयर) ही महापालिका असल्याने किमान वेतन मिळते का नाही हे बघण्याची जबाबदारी त्यांचीच आहे. प्रशासन या जबाबदारी पासून पळत असून त्यांनी 14,100 रुपयांवर सुरु केलेली भरती बेकायदेशीर आहे. कारण या रकमेतून कंत्राटदाराने जीएसटी, पीएफ, प्रोफेशनल टॅक्स तसेच ईएसआयसी भरल्यास केवळ 8100 इतकाच पगार चालकांना मिळतो. अशापद्धतीने महापालिका दिशाभूल करत असल्याचा आरोप आप प्रदेश संघटन सचिव संदीप देसाई यांनी केला.


सोमवारी महापालिकेसमोर ठिय्या मांडून महाघंटानाद करण्यात येणार आहे. यामध्ये अनेक पक्ष संघटनांचा सहभागी होणार आहेत.


दरम्यान बंद मुळे शहरभर कचऱ्याचे ढीग साचले आहेत. महापालिकेने काल 50 गाड्यांच्या माध्यमातून कचरा उठाव केला, परंतु आज फक्त सातच अधिक गाड्या त्यांना काढता आल्या. त्यामुळे टिप्पर चालकांच्या अभावी महापालिकेची पर्यायी यंत्रणा तोडकी पडत असल्याचा दावा आप ने केला आहे.


आंदोलनाच्या चौथ्या दिवशी सकल मराठा समाज, विक्रमनगर-टेम्बलाईवाडी विकास मंचचे बबन कवडे, ऍड. बाबा इंदुलकर, दिलीप देसाई, शकील जमादार, विवेक ताम्हणकर यांनी पाठिंबा जाहीर केला.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.