महा बँकेच्या शाखांमध्ये सोने तारण मेळाव्यास सुरूवात

 महा बँकेच्या शाखांमध्ये सोने तारण मेळाव्यास सुरूवात


कोल्हापूर १० न्यूज डेस्क

आज सोमवार (दि१०) बँक ऑफ महाराष्ट्राच्या विभागीय व्यवस्थापक के सुनीता दुर्गा यांनी हिरवा झेंडा दाखवून बँकेचा सर्व शाखा मध्ये सोने तारण मेळाव्याची सुरुवात केली आहे.

लोक विविध कारणांसाठी परवडेल तसे विविध कर्ज घेत असतात. काहीवेळा अडचणीच्या काळात अचानक पैसे हवे असतात. त्यावेळी काय करावं कळत नाही. अशावेळी तुम्ही आपल्या महाबँकेतून अत्यंत कमी व्याजदराने सोने तारण कर्ज घेऊ शकता. सोने तारण कर्ज हा एक उत्तम पर्याय आहे. बॅंक ऑफ महाराष्ट्र ही बँक सहज सोने तारण कर्ज मिळून देऊ शकते. ते वैयक्तिक कर्जापेक्षा स्वस्त आहे. कमी जोखमीमुळे सोने गहाण ठेवून कर्ज सहजपणे घेतले जाऊ शकते. त्यामुळे महाबँकेच्या माध्यमातून तुम्ही सोने तारण कर्ज घेतल्यास तुम्हाला फायदा होऊ शकतो.


  

बँकेच्या असंख्य ग्राहकांसाठी व्यावसायिक, कृषी, वैयक्तिक इत्यादी आवश्यक गरजांसाठी कर्ज मिळवण्याचा सहज सोपा मार्ग म्हणजे महा गोल्ड लोन योजना. अडचणीच्या वेळी मदतीला येणारा खरा मित्र म्हणजे सोने.

बँक ऑफ महाराष्ट्राच्या कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील सर्व शाखांमध्ये सोने तारण मेळावे सुरू झाले आहेत. बँक ऑफ महाराष्ट्र सोनेतारण कर्ज हे फक्त 8.10 व्याजदराने म्हणजेच प्रतिमाह ०.६७ व्याजदराने देत आहे. महा बँकेकडून सोनेतारण कर्ज हे अतिशय सुलभ प्रक्रियेने आणि कमीत कमी कागदपत्रे कर्ज मंजुरी देत आहे. बँकेच्या विभागीय व्यवस्थापक के सुनीता दुर्गा यांनी सर्व जनतेला आवाहन केले आहे की या सोनेतारण मेळाव्याचे जास्तीत जास्त लाभ घ्यावा.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.